खाप पंचायत आमीरच्या विरोधात एकत्र

चंडिगढ दि.१३- हरियानातील खाप पंचायतींबद्दल आमीरने त्याच्या सत्यमेव जयते कार्यक्रमातून केलेल्या वक्तव्याबद्दल सर्व खाप पंचायती एक झाल्याअसून त्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. आमीरने त्यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने दुखावलेल्या या पंचायतींनी आमीरच्या कार्यक्रमावर बंदी आणावी अशी मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमीरच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले आणि महाम चौबीसी खाप पंचायतीचे प्रमुख रणबीर सिंग यांनीच ही बैठक बोलावली असून त्यांनी या कार्यक्रमातून चुकीचा संदेश दिला गेल्याचा आरोप केला आहे. हरियाणाच्या वर्षानुवर्षे चालत आलेल्या सामाजिक बैठकीतच घुसण्याचा आमीरने प्रयत्न केला असल्याचा त्यांचा आरोप आहे. असल्या कार्यक्रमांमुळे आमच्या समाजाचा सामाजिक ढाँचाच नष्ट होईल अशी भीती व्यक्त करून ते म्हणाले की शतकानुशतके आम्ही बंधूभावाने नांदतो आहोत. या कार्यक्रमातून दिलेला संदेश आमच्या कार्याचे मोल कमी करणारा आणि आमची बदनामी करणारा आहे. हरियानात ११० खाप पंचायती असून पैकी ७२ आजही कार्यरत आहेत.

Leave a Comment