ऑडी, बीएमडब्ल्यूला चीनमध्ये चांगली मागणी

फ्रँकफर्ट दि.१३- जर्मन वाहन उद्योगातील बड्या समजल्या जाणार्‍या ऑडी आणि बीएमडब्ल्यू या वाहन कंपन्यांनी चीनमध्ये आपल्या उत्पादनांची विक्री अपेक्षेपेक्षा अधिक केली आहे. चीनमध्ये या दोन्ही गाड्यांच्या विक्रीत अनुक्रमे ४४.२ आणि ३१.५ टक्के इतकी वाढ नोंदविली आहे. यामुळे युरोपातील कार मार्केटमध्ये असलेल्या मंदीमुळे सोसावे लागत असलेले नुकसान भरून निघाले आहेच पण या दोन्ही कंपन्यांनी मोठा फायदाही मिळविला आहे. वर्षभराच्या गाडी विक्रीचे उदिष्ट्य या दोन्ही कंपन्यांनी मे महिन्याच ओलांडले आहे.

ऑडीची वाहन विक्रीतील जागतिक वाढ १३.२ टक्के आहे आणि त्यांनी १ लाख २८ हजार ९०० वाहने विकली आहेत. बीएमडब्ल्यूचा जागतिक विक्री वाढीचा वाटा ६.४ टक्के असून त्यांनी १लाख ५६ हजार ९५७ वाहने विकली आहेत. युरोपमध्ये ऑडीच्या विक्रीत ३.८ टक्के वाढ नोंदविली गेली आहे. मात्र आशियात या दोन्ही गाड्यांची होत असलेली जबरदस्त विक्री या कंपन्यांना फायद्यात घेऊन गेली आहे. युरोपातील अर्थव्यवस्था मंदावली आहे आणि युरोचा वापर करणार्‍या १७ देशांत ०.३ टक्के आर्थिक घट होईल असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

Leave a Comment