सोनीचे स्मार्टवॉच या महिन्यात भारतीय बाजारात

सोनी या जगप्रसिद्ध इलेक्ट्रोनिक्स कंपनीने  मोबाईल अॅक्सेसरी स्वरूपातील स्मार्टवॉच या महिन्यात भारतीय बाजारपेठेत दाखल होत असल्याचे जाहीर केले असून या घड्याळाची किंमत आहे ६२९९ रूपये. या घड्याळावर वेळ पाहण्याबरोबरच इनकमिंग कॉल, मेसेज, संगीत नियंत्रण, ईमेल इत्यादी सुविधा स्मार्टफोन बॅगेत अथवा खिशात असतानाही मिळू शकणार आहेत.

मनगटी घड्याळाप्रमाणेच हे हातात बांधायचे असून या घड्याळाला १.३ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. युजर त्याचा स्मार्टफोन खिशात अथवा बॅगेत असला तरी या डिस्प्लेमधून त्याला इनकमिंग कॉल अपडेट, तसेच मेसेजेस मिळणार आहेतच पण फेसबुक, ट्वीटर अपडेटही मिळू शकणार आहेत. हे घड्याळ  अँड्राईड स्मार्टफोन ब्ल्यू टूथच्या माध्यमातून कनेक्ट करू शकणार आहे त्यामुळे फोन हातात नसला तरी त्याचे कि फंक्शन्स कंट्रोल करणे शक्य होणार आहे. मात्र या घडयाळासाठी इतकी किंमत मोजणे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment