आधुनिक भारताचे कटु वास्तव ‘शांघाई’

‘खोसला का घोसला’, ‘ओय लकी लकी ओय’, ‘लव्ह सेक्स और धोका’ या वेगळ्या घाटनीच्या चित्रपटामधुन आपले वेगळेपण सिद्ध करणारा दिवाकर बॅनर्जी ‘शांघाई’च्या रूपाने सामाजिक, राजकीय थरारपट रसिकांसाठी घेऊन आला आहे. विकास कोणाचा आणि कशासाठी हा नेहमीच चर्चीला जाणारा प्रश्न दिवाकरने या चित्रपटात हाताळला आहे.

‘शांघाई’ चित्रपटाचे कथानक एका मध्यमवस्तीच्या गावातील आहे. राज्य सरकारच्यावतीने या ठिकाणी इंटरनॅशनल बिझनेस पार्क बनविण्याचे काम सूरू आहे. याकामासाठी एका वस्तीचे विस्थापन करण्यात येणार. हे टाळण्यासाठी डॉ.अहमदी (प्रसेनजित चॅटर्जी) हे प्रयत्नशिल आहेत. प्राध्यापक असले, तरी ते मुळातील चळवळीतील व्यक्तिमत्त्व. ते या गावाला भेट देण्यासाठी येणार असतात.

विशेष आर्थिक क्षेत्राच्या नावाखाली देशातील गरिबांची कशी पिळवणूक चाललीये, याची त्यांना पुरेशी माहिती असते.  डॉ. अहमदी यांना पाठिबा देणार्‍यांची संख्याही मोठी. पुढे डॉ. अहमदी रस्त्यावरील अपघातात मारले जातात. हा अपघात नसून, घातपात आहे, अहमदी यांचा खून करण्यात आल्याची सर्वांनाच खात्री असते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री चित्रपटात प्रकटतात. मुख्यमंत्री सखोल चौकशीचे आदेश देतात आणि आपल्या मर्जीतील कृष्णन् ( अभय देओल) या अधिकार्‍याच्य नेतृत्वखाली न्यायालयीन चौकशी करण्याचे जाहिर करतात.

दरम्यान, डॉ. अहमदी यांची न्युयॉर्क मधील विद्यार्थीनी शालिनी सहाय (कल्की कोचलिन ) त्यांच्या अपघातानंतर त्याची व्यत्ति*गत पातळीवर चौकशी सुरू करते. स्थानिक मिडीयाचा ङ्गोटोग्राङ्गर असलेला परमार (इम्रान हाश्मी)  अहमदी यांच्या अपघाताच्या अगोदर काहीवेळ तिथे उपस्थित असतो. अपघाताचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या त्याच्या भागीदाराचीही पुढे हत्या होते.  त्यानंतर इम्रान व कल्की एकत्र येऊन शोध सूरू करतात.

दिग्दर्शक दिवाकर बॅनर्जी याने शांघायमध्ये राजकिय विश्लेषण, वास्तववादी  परिस्थितेचे चित्रण करतानाही मनोरंजनावर त्याचा परिणाम होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली आहे.  कथा रंगविताना देशातील अराजक स्थितीचा आणि संचारबंदीचा परिणामकारक वापर करण्यात आला आहे.  चित्रपटात अनेक जमेच्या बाजू असल्यातरी काही गोष्टींचा कथेमध्ये अभाव जाणवतो, त्या म्हणजे चळवळीतील नेत्याचा संशयस्पद मृत्यु झाल्यानंतरही विरोधी पक्ष गप्प आहेत. डॉ. अहमदीनींच्या बायकोची एन्ट*ी अचानक होते अणि त्याच पद्धतीने ती गायब होते.

‘वन्स अपॉन टाइम इन मुंबइ’र्, ‘द डर्टी पि*चर’ या चित्रपटात आपली वेगळी छाप सोडणार इम्रान हाश्मीचा अभिनय शंघाय मध्येही प्रभावशाली आहे. चौकशी अधिकारी कृष्णनच्या व्यक्तिरेखेत  अभय देओल अगदी चपखल बसला आहे. ङ्गारुख शेख, प्रसेनजित चॅटर्जी या दोन्ही अनुभवी अभिनेत्यांचा अभिनय सहजसुंदर झाला आहे. दोघांच्याही व्यक्तिरेखा अत्यंत जिवंत वाटतात. कथेला साजेस संगीत विशाल – शेखर यांनी दिले आहे.  उत्कृष्ट कॅमेरावर्कमुळे कथेला एक वेगळा लूक मिळाला आहे.

विकास कामे करत असताना दोन वेगळ्या स्तरांवरील नागरिकांमधील, दोन वर्गामधील वाढती दरी नेमकेपणाने मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. स्थानिक भूमिपूत्र विरुद्ध बहुराष्ट*ीय कंपन्या आणि त्यांचा समर्थक वर्ग हेच ते दोन वर्ग. विकास कामांना होणार विरोध, विकास प्रकल्पांसाठी विस्थापीत व्हावे लागले किवा होण्याच्या मार्गावर आहेत अशा लोकांची संख्या आता वाढत चालली आहे, हेच आधुनिक भारताचे कटु वास्तव मांडणारी  कथा म्हणजे ‘शांघाई’.

चित्रपट – शांघाय
निर्माता – अजय बिजली
दिग्दर्शक – दिवाकर बॅनर्जी
संगीत – विशाल-शेखर
 कलाकार – इम्रान हाश्मी, अभय देओल, कल्की कोचलीन, प्रसनजीत चॅटर्जी, ङ्गारूख शेख

चित्रपट रेटिंग – ***

– भूपाल पंडित

Leave a Comment