
सोनी या जगप्रसिद्ध इलेक्ट्रोनिक्स कंपनीने मोबाईल अॅक्सेसरी स्वरूपातील स्मार्टवॉच या महिन्यात भारतीय बाजारपेठेत दाखल होत असल्याचे जाहीर केले असून या घड्याळाची किंमत आहे ६२९९ रूपये. या घड्याळावर वेळ पाहण्याबरोबरच इनकमिंग कॉल, मेसेज, संगीत नियंत्रण, ईमेल इत्यादी सुविधा स्मार्टफोन बॅगेत अथवा खिशात असतानाही मिळू शकणार आहेत.