यवतमाळचा बालक काढतो १८ प्राण्यांचे आवाज

sound

यवतमाळ – काही मुले दैवी स्वरुपाची असतात असे विज्ञान युगातही म्हणावे लागते. सभोवतालच्या समूहात घडणारे जनजीवन चमत्कार नास्तिकालाही आस्तिक बनविल्याशिवाय राहत नाही. अशाच अभिजात दैवी देणगीने जन्मास आलेल्या माहूर तालुक्यातील मदनापूर येथील १४ वर्षीय ऋषिकेशने सार्‍यांनाच अचंबित केले आहे. आर्णी शहरात पार पडलेल्या धार्मिक शिबिरात आध्यात्मिकतेचे धडे घेण्यासाठी तो आला असता त्याने तब्बल १८ प्राण्यांचे आवाज काढून दाखविल्याने उपस्थित सारे अवाक् झाले.

एकीकडे विज्ञान प्रगत होत असताना आध्यात्मिक पातळीवरील संशोधन करण्याचा रस मात्र कुणीही घेतल्याचे दिसत नाही. अध्यात्मातून सर्व जगाला ज्ञानदान करण्याचे सामर्थ्य असलेल्या देशात समाजातील सकारात्मक ऊर्जा जागृत करण्याचे कार्य मात्र अद्यापही होऊ शकले नाही. त्यामुळे अनेक चमत्कारिक घटना समाजाच्या नजरेआड राहिल्याने त्या तशाच लुप्त झाल्या आहे. विविध कला संस्कृती अद्वितीय असलेल्या या समूहात त्यास चालना देण्यासाठी कुणीही पुढे येत नसल्याने उपेक्षितांची संख्या मात्र वाढली आहे. अशाच प्रकारे माहूर तालुक्यातील मदनापूर येथून ऋषिकेश हा आर्णी येथे संपन्न झालेल्या जोग महाराज बाल सुसंस्कार वारकरी आध्यात्मिक शिबिरात अध्यात्म्याचे धडे घेण्यासाठी दाखल झाला. बालवयात धार्मिक संस्कार अंगात रुजविण्यासाठी झटणार्‍या व ८ वी मध्ये शिकणार्‍या या १४ वर्षीय प्रतिभाशाली बालकाने या शिबिरात अनेकांना भुरळ घातली.

ऋषिकेशच्या आवाजाने त्याच्या मनातील अनेकविध अवस्थांचे रंग बाहेर काढले. त्याने कुत्रा, माकड, कोंबडी, मांजर, लहान पिलांचे भांडण, वाघ, डुक्कर, गाढव, कोल्हा, हत्ती, चिमणी, कोकिळा, गोरीला, उंदीर, गाय,  बैल, अस्वल तसेच सापांचे विष जसे बाहेर पडते अगदी हुबेहुब तसा आवाज, पूर्ण पोट आतमध्ये घेऊन गणपतीची प्रतिमाही त्याने तयार करुन दाखविली.

Leave a Comment