परिवहन कर्मचार्‍याचा उद्रेक परिवहन प्रशासनाच्या अधिकार्‍यासह तिघांना कर्मचार्‍याचा चोप

ठाणे, दि. ११ – ५ व्या वेतन आणि ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी अद्याप मिळाली नाही. पालिका कर्मचार्‍यांना मात्र ६ व्या वेतन आयोगाच्या तिसरा हप्ता मिळाला. शाळा सुरू झाल्या कुणीतरी शाळेत खर्चासाठी मदत करा अशा कर्मचार्‍याच्या टाहोला बगल दिल्याने कर्मचार्‍यात उद्रेक होउन परिवहन प्रशासनाच्या एका अधिकारी आणि तीन कर्मचारी यांना परिवहन कर्मचार्‍यांनी चांगलाच चोप दिल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. परिवहन सेवा सुरळीत व्हावी म्हणून मदतीचा हात देणार्‍या परिवहन कर्मचार्‍यांना निधी मिळाल्यानंतरही थकीत रक्कम न मिळाल्याने संतप्त झालेल्या परिवहन कर्मचार्‍यांनी परिवहन प्रशासनाचे प्रशासकिय अधिकारी दामोदर नानकर वरीष्ठ लिपिक पीटर पिटो, लिपीक प्रभात कोल्हे उपलेखपाल धामणसे यांना बेदम मारहाण करण्यात आली. नानकर यांना ठाण्याच्या ज्युपिटर रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले तर पिटो, धामणसे आणि कोल्हे यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले या प्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अद्याप कोणाला अटक करण्यात आली नाही.

Leave a Comment