
पुणे, दि. ९ – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे चौथे विश्व साहित्य संमेलन ‘टोरांटो’ येथे होणार होते. याबाबत कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. त्यावर येत्या दोन दिवसात आयोजकांशी निर्णायक चर्चा होणार आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी दिली. विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या साहित्य महमंडळाच्या कार्यकरणीच्या बैठकीत विश्व साहित्य संमेलन आर्थिक कारणास्तव अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, चौथे विश्व साहित्य संमेलनाबाबत येत्या दोन दिवसात निर्णय होणार असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले.
