महिन्याभरात टोल वसूली न थांबल्यास ‘डाऊ स्टाएलने’ आंदोलन

पुणे, दि. ९ – राज्यातील विविध महामार्गावर बेकायदेशीररित्या टोल वसूली केली जात असून, यामधून ठेकदारांनी पाच पटीहून अधिक पैसे वसूल केले आहेत. रस्त्यावरील वाहनचालक हा संघटितरित्या लढू शकत नाही हे पाहून ठेकेदार टोल वसुलीची मुदत संपून देखील सक्तीने टोल वसुली करत आहेत. ही टोल वसुली महिन्याभरात संपली नाही, तर सर्व लोकांना घेऊन आपण डाऊ स्टाईलने आंदोलन करणार असल्याची माहिती शनिवारी बंडातात्या कराडकर यांनी दिली.

महाराष्ट्रातील विविध महामार्गावरील बेकायदेशीर टोलनाके बंद व्हावेत, या मागणीसाठी व्यसनमुक्ती संघ आणि इतर विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती कराड यांनी पत्रकार परिषद दिली.

टोलनाक्यांसदर्भात बोलताना मोहळे म्हणाले, महामार्गावरील टोल नाके हा सामान्याचा जीवघेणा प्रकार बनला आहे. टोलवसुली सक्तीने केली जात आहे. मात्र, अजूनही महामार्गावरील अनेक कामे ही अपूर्ण आहेत. यामधील काम निकृष्ठ दर्जाचे राहीले आहे. कोरगाव भीमा येथे एकच टोल नाका मंजूर असताना टोलवसुलीची मुदत निम्म्यावर यावी म्हणून राजंणगाव येथे दुसरा टोलनाका उभारण्यात आला. दोन्हीची मुदत संपली असताना सुद्धा सक्तीने येथे टोलवसुली केली जात आहे. त्याचबरोबर या दोन्ही टोलनाक्यातून वसुली होत असताना ३० टक्के कालावधी कमी व्हायला हवा होता पण तो ग्राह्य धरलाच नाही. त्यामुळे टोलवसुली ही शासनमान्य वाटणारी करण्याचा प्रकार सुरू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.