
नवी दिल्ली दि.८- पेट्रोलचे दर आता आकाशाला भिडले आहेत आणि भविष्यात ते खाली येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. सर्वसामान्य माणसाला आता कार घ्यायची असेल तर प्रथम पेट्रोलदराचाच विचार करावा लागणार .मात्र टाटा मोटर्सने सर्वसामान्यांना दिलासा मिळेल आणि त्यांची कारची हौसही भागविली जाईल अशी कार तयार केली आहे. एक लाख रूपयांत नॅनोचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर आता ही नवी टाटा मेगापिक्सल कारही सर्वसामान्यांचे गाडीचे स्वप्न पूर्ण करेल असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे.