अभिनवने रणबीरला बनविले ‘बेशरम’

तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या रणबीर कपूरच्या घरासमोर सध्या निर्मात्यांची रांग लागली आहे. बॉलीवूडमधील आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करण्यात व्यस्त असलेला रणबीर लवकरच कश्यप बंधूंच्या सोबतही चमकणार असल्याची बातमी आहे. अनुराग आणि अभिनव या कश्यप बंधूंनी रणबीरसोबत चित्रपट बनवण्याची योजना आखल्याचे त्या बातमीत म्हटले होते. अभिनवच्या चित्रपटाचे चित्रीकरण अनुरागच्या चित्रपटाच्या आधी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभिनवचा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर अनुरागच्या चित्रपटासाठी पुढल्या वर्षी मार्च-एप्रिल महिन्यातील मुहूर्त काढण्यात आला आहे. अभिनवच्या चित्रपटाचे नाव बेशरम असे ठेवण्यात आले असून, या चित्रपटाची कथा दिल्लीतील आहे. यात रणबीर एका कार चोराची भूमिका साकारणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र चित्रपटाचे नाव ‘बेशरम’असे का? हा प्रश्‍नच आहे. 

Leave a Comment