टी-२० विश्वचषकाच्या अॅम्बॅसेडरपदी लसिथ मलिंगा

कोलंबो, दि. ८ – श्रीलंकेत सप्टेंबरमध्ये होणार्‍या टी-२० विश्वचषक २०१२ स्पर्धेच्या अँम्बॅसेडरपदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाची निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भल्याभल्या खेळाडूंची यॉर्कर या मलिंगास्त्राने दांडी गुल करणारा मलिंगा हा एक उत्तम टी-२० खेळाडू आहे. त्याच्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरील कौशल्यामुळे त्याची या पदी निवड करण्यात आली आहे.

आशियामध्ये आणि श्रीलंकेत पहिल्यांदा टी-२० स्पर्धा होत आहेत त्यासाठी माझी नियुक्ती अँम्बॅसेडरपदी झाली असल्याने मला आभिमान वाटत आहे, असे मलिंगा म्हणाला. टी-२० खेळाचा अँम्बॅसेडर म्हणून या खेळ जागतिक स्तरावर पोहचण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन असेही त्याने सांगितले.
मलिंगा हा एकमेव खेळाडू आहे ज्याने एकदिवसीय आणि टी-२० सामन्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे आणि भाविष्यात तो फक्त याच दोन क्रिकेट फॉरमॅट मध्ये  श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

Leave a Comment