सियाचीन प्रांतातून सैन्य कमी करण्याचा भारताचा विचार

नवी दिल्ली, दि. ८ – भारत आणि पाकिस्तानच्या गृहसचिवांची ११ व १२ जून रोजी बैठक होणार आहे. या दोन दिवसीय बैठकीत सियाचीन भागातून सैन्य कमी करण्याचा विचार भारत करू शकतो. याआधी देखील भारत आणि पाकिस्तानी गृहसचिवांची बैठक पार पडली होती. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली होती.  

सियाचीन भागातून एकतर्फी सैन्य हटवण्यास पाकिस्तानने अनेकवेळा नकार दर्शवला होता. तर पाकिस्तानच्या सुरक्षा मंत्र्यांनी सियाचीन मुद्दा हाताळण्यात पाकिस्तान आणि भारताचे सैन्य सर्वात मोठी बाधा असल्याचे सांगितले होते.

या प्रकरणी योग्य मार्ग काढण्यासाठी सर्वात मोठी अडचण दोन्ही देशांचे सैन्य असल्याचे पाकिस्तानी सुरक्षा मंत्री चौधरी अहमद मुख्तार यांनी सांगितले होते.

Leave a Comment