मुंबई ः महाराष्ट्र विभागीय आणि शहर नियोजन कायद्याचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप चित्रपट अभिनेते सलमान खान यांच्यावर माजी आयपीएस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते वाय. पी. सिह यांनी शुक्रवारी येथे केला आहे.

सलमान खान यांनी ‘दि अॅड्रेस’ नावाच्या इमारतीत एक सदनिका खरेदी केली असल्याचे समजते. ही सदनिका बुलक कार्ट मार्गावर बांद्रा येथे आहे. या सदनिकेचे ‘अधिकार पत्र’ हे सध्या वादात आहे. ज्यांच्याकडे हे अधिकार पत्र आहे त्यांनी ही सदनिका सलमान यांचे वडिल सलीम खान यांना दिली आहे.पत्रकारांना वाय. पी. सिह याननी सादर केलेल्या कागदपत्रावरून सलमान खानने कागदावर १/७९.९५ चौरस फुटाची सदनिका खरेदी केली आहे. व त्यासाठी त्याने २० कोटी रुपये मोजले आहेत.
परंतु, जेव्हा खान यांनी १ लाख ८० हजार रुपये प्रति चौरस फुट दिले होते त्या वेळी ती रक्कम त्या वेळच्या बाजारभावापेक्षा खूप जास्त होती. त्या वेळचा बाजारभाव २५ ते ३० हजार प्रति चौरस फुट इतका होता. या वरून स्पष्ट होते की, जादा दिलेली रक्कम चटईक्षेत्र नसलेली जागा मिळविण्यासाठी आहे. आणि अशा प्रकारे जागा विकता येत नाही. कागदावर सदनिका १०७९.९५ चौरस फुट दाखविण्यात आलेली असली तरी प्रत्यक्षात सुमारे ८ हजार चौरस फुटाची सदनिका आहे. आणि ही फार मोठी फसवणूक असल्याचे सिंह यांचे म्हणणे आहे.