ब्रॉडबॅण्ड सेवेसाठी रिलायन्स सज्ज

मुंबई, दि. ८ – ब्रॉडबॅण्ड सेवेचा राष्ट्रीय स्तरावरील परवाना असलेली रिलायन्स इंडस्ट्री ब्रॉडबॅण्ड सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने वित्तसेवा, शिक्षण, सुरक्षा व मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये ब्रॉडबॅण्ड सेवा देण्यासाठीचा अंतिम आराखडा तयार केला आहे. ब्रॉडबॅण्डची सेवा पूर्णपणे सुरू झाल्यानंतर महसुलात वाढ होऊन त्याचा गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळेल. ही सेवा केव्हा सुरू होईल, याबाबत मात्र कंपनीकडून निश्चित काही सांगण्यात आलेले नाही.

ब्रॉडबॅण्ड सेवेसाठी काही पायाभूत सुविधांची आवश्यकता असून या संदर्भात ही कंपनी संबंधीत अन्य कंपन्यांशी चर्चा करीत आहे. रिलायन्सची उपकंपनी असलेल्या इंफोटेल ब्रॉडबॅण्ड या कंपनीला २० मेगाहर्टझ् स्पेक्ट्रमचा परवाना मिळाला आहे. यासाठी कंपनीने १२ हजार ८४७ कोटी ७५ लाख रूपये खर्च केले आहेत. या परवान्याच्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्रामध्ये जोरदार मुसंडी मारण्याचे कंपनीने ठरविले आहे.

Leave a Comment