इंडिया सिमेंटचे शेअर सीबीआयचे समन्स आल्याने घसरले

नवी दिल्ली दि ८- वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी बीसीसीआयचे प्रमुख व इंडिया सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक एन. श्रीनिवासन यांना समन्स पाठविले. या घटनेमुळे इंडिया सिमेंट कंपनीचे शेअर ५ टक्क्याने घसरले.

श्रीनिवासन यांना सीबीआयच्या कार्यालयता पुढील आठवड्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

श्रीनिवासन यांच्या कंपनीने जगनमोहन याच्या कंपनीत वडिल वायएसआर राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री असताना किती गुंतवणूक केली होती, याची सीबीआय चौकशी करणार असल्याचे समजते.