अक्षय – सोनक्षीचा `जोकर’ सप्टेंबरमध्ये

अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असलेला `जोकर’ हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक शिरीष कुंदर आणि फराह खान यांनी ही माहिती ट्विटरवर दिली आहे.

शिरीषने या चित्रपटाचे एक छायाचित्रही ट्विटरवर पोस्ट केले आहे. सोनाक्षी आणि अक्षय कुमार या जोडीचा रावडी राठोड हा चित्रपट सध्या हिट झाला आहे. त्यामुळे जोकर चित्रपटाकडूनही अपेक्षा वाढल्या आहेत.

शिरीष कुंदर यांनी अक्षय कुमारसोबत यापूर्वी केलेल्या ‘तीस मार खान’ या चित्रपटाने प्रेक्षकांचा हिरमोड केला होता. त्यामुळे या चित्रपटाकडून कुंदर यांनाही चांगल्या अपेक्षा आहेत. चित्रपटात या सोनाक्षी-अक्षय जोडीसोबतच श्रेयस तळपदे, मिनिषा लांबा, असरानी हे ही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Leave a Comment