मुंबई, दि. ७ – भारतातील आघाडीची अभियांत्रिकी कंपन्यांपैकी असलेल्या ग्रिव्हज कॉटन लिमिटेडच्या ग्रिव्हज ऑटोमोटिव्ह विभागाला पुणे येथे झालेल्या टाटा मोटर्स व्हेंडर्स परिषद – २०१२ मध्ये टाटा मोटर्सच्या वतीने देण्यात येणारा `एक्सेलन्स इन डिलेव्हरी’ हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. येस झीप आणि मॅजीक आयरीस यासारख्या मागणी असलेल्या वाहनांच्या इंजिनांची टाटा मोटर्सकडून वाढलेली मागणी योग्यरित्या पूर्ण करण्याचे काम ग्रिव्हजच्या वाहन विभागाने पार पाडले त्याबद्दल कंपनीला या पुरस्काराने गौरविण्यात आले.
याबाबत बोलताना ग्रिव्हजच्या वाहन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार म्हणाले की, टाटा मोटर्सकडून मिळालेला हा पुरस्कार म्हणजे आमच्या उत्पादनाची क्षमता, पुरवठ्यातील तत्परता आणि नियोजित वेळेत दिलेला जाणारा माल यासारख्या वैशिष्ट्यांची पावती आहे.
ग्रिव्हज कॉटन लिमिटेड ही २०० कोटी रुपयांची कंपनी असून, विविध ठिकाणी उत्पादन सुरु असलेली बहू उत्पादित कंपनी आहे. भारतातील अभियांत्रिकी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यापैकी ही एक उत्तम कंपनी आहे. देशभरातील ११ उत्पादन प्रकल्पांद्वारे कंपनीने या क्षेत्रातील आपला दबदबा कायम ठेवला आहे.