अशुतोष साकारणार मोहेंजोदडो

इतिहासाची पाने उलगडणार्‍या चित्रपटांची निर्मिती-दिग्दर्शन करणारा असा नावलौकिक मिळवणारा आशुतोष गोवारीकर आणखी एक ऐतिहासिक चित्रपट पडद्यावर साकारणार आहे.

लगान, जोधा अकबर पर्यंत आशुतोषने जे काही केले ते ऐतिहासिक आणि भव्यदिव्य असेच होते. त्यामुळे आशुतोष पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपट बनवणार यात कोणाला नवल वाटणार नाही. काळाच्या पडद्याआड गेलेली मोहेंजोदडो संस्कृती पडद्यावर आणण्याचे शिवधनुष्य आशुतोष उचलणार असल्याचे म्हटल्यावर उत्सुकता नक्कीच वाढेल.

आपल्या सहजसुंदर दिग्दर्शनाद्वारे आजच्या पिढीला इतिहासाचे दर्शन घडवणारा आशुतोष पुन्हा एकदा इतिहासाची पाने उलगडण्यासाठी सज्ज झाला असल्याची माहिती हाती आली आहे. आशुतोष सध्या मोहेंजोदडो संस्कृतीचा अभ्यास करीत असून, त्यावर आधारित पटकथा रचण्याच्या कामगिरीत मग्न असल्याचे समजते.

Leave a Comment