मारूती सुझुकीने स्वीकारले पर्यावरणस्नेही धोरण

नवी दिल्ली, दि. ६-  मारूती सुझुकी लिमिटेड कंपनीने जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून आपल्या कारखान्यातील वायू उत्सर्जन व वाहनांमुळे निर्माण होणारे ग्रीनहाऊस उत्सर्जन यांचा प्रभाव कमी करण्यासाठी विस्तृत पर्यावरण धोरणाची घोषणा केली.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक शिझो नाकानिशी म्हणाले की, आम्ही हरित कंपनी होण्यासाठी व त्यायोगे पर्यावरणांचे संरक्षण होण्यास मदत होणार्‍या स्त्रोतांचा किमान वापर होणारे एक धोरण आखले आहे. आमचा व्यवसाय विस्तारत असून कारखान्यांची संख्या वाढत आहे. अशावेळी पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान व प्रक्रियांसाठी गुंतवणूक करून आमच्या व्यवसायाचा पर्यावरणावर किमान परिणाम होईल, यावर आम्ही लक्ष केंद्रीत करीत आहोत. परिणामी आम्ही नव्या पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानाचा स्वीकार करून त्यासाठी गुंतवणूक करणार आहोत. कंपनीने स्वीकारलेल्या पर्यावरणस्नेही उपक्रमांमध्ये निर्मिती प्रचालनात अल्पकार्बन फूटप्रिंट, नवे तंत्रज्ञान शोधणे, स्वीकारणे आणि त्यासाठी गुंतवणूक करणे तसेच इंधन कार्यक्षमतेत वाढ करून वाहनांची कार्बन फूटप्रिंट कमी करणे या प्रमुख गोष्टींचा अंतर्भाव आहे.

Leave a Comment