गॉसिपमुळे सोनाक्षी नाराज

`दबंग’ गर्ल सोनाक्षी सिन्हा सध्या नाराज आहे. चित्रपटांपेक्षा ती कोणाबरोबर डेटिंग करते, कोणाला भेटते याचीच सध्या जास्त चर्चा होते. त्याऐवजी चित्रपटांची चर्चा व्हावी, असे सोनाक्षीला वाटते. गॉसिप्समुळे सोनाक्षीबाई सध्या वैतागल्या आहेत. तिने रणवीर सिंगविषयी केलेल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यातच ‘लुटेरा’च्या सेटवरचे रणवीर आणि सोनाक्षीचे किस्से ऐकून पप्पा शत्रुघ्न सिन्हा यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सोनाक्षीबाईंची डोकेदुखी वाढली आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा व्यावसायिक आयुष्याची चर्चा व्हावी, असे तिने म्हटले आहे.

Leave a Comment