
भारतीय कार मार्केटमधील लिडींग कंपनी असलेल्या टोयाटो इंडियाने अतिशय आकर्षक स्वरूपातील करोला अल्टीस एरो कारची लिमिटेड एडिशन बाजारात आणली असून त्याची किमत ११लाख ४७ हजार रूपये इतकी ठरविण्यात आली आहे. टोयाटो गेले दशकभर भारतीय बाजारात यशस्वी कंपनी म्हणून आपली उत्पादने विकत आहे. दशकपूर्तीच्या निमित्तानेच कंपनीने आपले यश स्थानिक ग्राहकांच्या समवेत साजरे करण्यासाठी ही लिमिटेड एडिशन बाजारात आणली असल्याचे आणि त्या अंतर्गत फक्त पाचशे गाड्यांचीच विक्री करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले आहे. सप्टेंबरपर्यंतच ही ऑफर खुली ठेवण्यात आली आहे.