बाबुरावला पकडा येत्या शुक्रवारी

तन्मय सेनगुप्ता आणि अश्विनकुमार क्षीरसागर यांची निर्मिती असलेला बाबूरावला पकडा हा मराठी चित्रपट आपल्या भल्यामोठया स्टारकास्टसह पूर्णपणे बँकॉकमध्ये चित्रीत केला आहे. यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे हुकुमाचे तीन एक्के म्हणजे भरत जाधव, संजय नार्वेकर आणि मकरंद अनासपुरे यांची एकत्रित धम्माल पहायला मिळणार आहे. आशिष उबाळे दिग्दर्शित हा चित्रपट येत्या  ८ जून ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.

साई व्हिजन शोबिझ निर्मित, वॉचटॉवर इंटरनॅशनल प्रस्तुत बाबूरावला पकडा मध्ये समीर धर्माधिकारी, निशा परुळेकर, सई ताम्हणकर या नामवंत मराठी कलाकारांच्या भूमिका आहे.

बाबूरावची मुंबईमध्ये स्वतःची चाळ आहे आणि त्या चाळीवर बाबूरावचा मित्र चिमण पोपटची नजर आहे. चिमणची बहीण चमेली बाबूराव वर प्रेम करते. त्याचाच तर फायदा चिमण पोपटला करुन घ्यायचाय, पण बाबूराव जास्त हुशार म्हणून त्याने चिमण पोपटला मूर्ख बनवून त्याचे पैसे घेवून चमेलीसोबत बँकॉकला पळून गेला. आता बँकॉकमध्ये काय घडतं हे पाहण्यासाठी चित्रपटगृहात जावं लागेल. गीतकार सागर पवार व ज्ञानेश वाकुडकर यांनी लिहिलेल्या यातील  गीतांना दुर्गा नटराज यांनी संगीत दिले आहे.  सिनेमांचे डिजीटल पोस्टर तयार करुन प्रमोशन करण्याची नवी पद्धत या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीतही वापरण्यात आली आहे.

Leave a Comment