गौरी शाहरुख खान आणि सुझान हृतिक रोशन या स्टार पत्नींना इनसिक्युअर फिल करायला भाग पाडणारी प्रियंका चोप्रा हिचे आणि करण जोहर यांच्यात दिलजमाई झाल्याची पक्की खबर आलीय. आपल्या मैत्रिणी म्हणजेच गौरी खान आणि सुझान रोशन यांच्या बाजूने करण जोहरने काही दिवसांपूर्वी प्रियंका चोप्रावर ट्विटरवर हल्लाबोल केला होता. स्टार्सना गळाला लावणारी म्हणून तिचा उल्लेख केला होता.
करण-प्रियंकाची दिलजमाई!
करणने हे युद्ध आपल्या मैत्रिणींसाठी केले होते. बराच काळ तो त्यांच्या बाजूने प्रियंकाशी भांडतही होता. त्याचा ट्विटरवरच्या हल्ल्याला प्रियंकाने केलेले प्रतिउत्तर आणि एकूणच शीतयुद्ध जोरात सुरू होते; परंतु करण जोहरने हे युद्ध थांबविण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे, तर त्याने प्रियंकाला आपल्या बर्थ डे पार्टीचे आमंत्रणही पाठविले. प्रियंकानेही कुठलाही संकोच न ठेवता त्याच्या पार्टीत सहभागी झाली. या दोघांचीही दिलजमाई तर झाली; पण आता प्रश्न एकच उरला आहे, की प्रियंकाने सहजासहजी त्यांच्यातील हे कोल्ड वॉर कसे मिटवले, कुठल्या तरी चित्रपटासाठी त्यांची ही दिलजमाई तर नसेल ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.