सैफ करिनाचे शुभमंगल १६ आक्टोबरला

गेले कित्येक दिवस चर्चेत असलेले सैफ अली खान आणि कपूर कन्या करिना हे अखेर १६ आक्टोबर रोजी विवाहबंधनात अडकत असल्याचे खुद्द सासूबाई शर्मिला टागोर यांनीच जाहीर केले आहे. हरियानातील त्यांच्या मूळ गांवी म्हणजे पतौदी येथे हा विवाहसमारंभ साजरा होणार असून त्याला फक्त अगदी जवळच्याच मंडळींना निमंत्रित करण्यात येणार आहे. सैफचे वडील आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांचे अलिकडेच निधन झाले असून त्यानंतर सैफ या घराण्याचा १० वा नबाब बनला आहे.
 
करिना विवाहानंतरही चित्रपटांतून काम करणार असल्याचे सांगून शर्मिला टागोर म्हणाल्या की मीही माझ्या विवाहानंतर चित्रपटात कामे करत होते आणि विवाहनंतरच माझी कारकिर्द बहरली होती. सैफ अगदी छोटा असतानाच त्यांचा आराधना हा गाजलेला चित्रपट प्रदर्शित झाला होता. करिनाच्या हातात सध्या हिरॉईन आणि रेस टू असे दोन चित्रपट असून विवाहामुळे या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये कोणताही अडथळा येणार नाही असे करिनाने सांगितले आहे. लग्नाचा स्वागत समारंभ मुंबईत होणार असून विवाहनंतर हनिमूनसाठी सध्या तरी करिनाकडे वेळ नाही असे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment