सचिन तेंडुलकर आज खासदारकीची शपथ घेणार

 मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर ४ जूनला राज्यसभेच्या खासदारपदाची शपथ घेणार आहे. ३९ वर्षीय तेंडुलकरला नुकतेच संसदेच्या राज्यसभेसाठी खासदार म्हणून राष्ट्रपतीकंडून सन्मानित करण्यात आले आहे. राज्यसभेचे अध्यक्ष हामिद अन्सारी यांच्या उपस्थितीत सचिनला सदस्यत्वाची शपथ दिली जाणार असल्याचे संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव शुक्ला यांनी सांगितले. यापूर्वी अभिनेत्री रेखा आणि व्यावसायिक अनु आगा यांनी या महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यसभेच्या मनोनित सदस्य म्हणून शपथ घेतली होती. सचिन तेंडुलकर आयपीएल क्रिकेट सामन्यामंध्ये व्यस्त असल्यामुळे तो येऊ शकला नव्हता.

Leave a Comment