अण्णा वाशीत घेणार सभा

नवी मुंबई, दि. ३ – सशक्त लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी व महाराष्ट्राच्या विधिमंडळात लोकायुक्त कायदा पारित होण्यासाठी समाजसेवक अण्णा हजारे महाराष्ट्रात झंझावती दौरा करीत आहेत. या कायद्याचाच एक भाग म्हणून जनजागृती करण्यासाठी ६ जून रोजी अण्णा हजारे नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाटयगृहात नवी मुंबईकरांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या नाटयगृहात सभेचे आयोजनही करण्यात आले आहे.

Leave a Comment