संजयदत्तचा `खल्लास’

‘खल्लास’ म्हटले की रामगोपाल वर्माच्या ‘कंपनी’ चित्रपटातील इशा कोप्पीकरचे  ठसकेबाज आयटम सॉंग आठवते; पण आता याच `खल्लास’ नावाचा एक चित्रपट आकाराला येत आहे. संजयदत्तला मुख्य भूमिकेत घेऊन कोरिओग्राफर अहमद खानने खल्लासची योजना आखली आहे. यासाठी लवकरच अहमद रामूची रीतसर परवानगी घेण्याच्या विचारात आहेत. रामूनेच अहमदला आपल्या रंगीला चित्रपटामध्ये मोठा ब्रेक दिला होता. त्यानंतर रामूच्या सत्यासाठीही अहमदने कोरिओग्राफी केली होती. त्यानंतर बरीच वर्षे दोघांनी एकत्र काम केले नाही आणि डिपार्टमेंटच्या निमित्ताने अहमदने पुन्हा रामूच्या  गाण्यांची कोरिओग्राफी केली. हे संबंध लक्षात घेता रामूची परवानगी घेऊन नंतरच आपल्या चित्रपटाला सुरुवात करण्याचे अहमदने ठरवले आहे. खल्लासमध्ये संजय एका निवृत्त सिक्युरिटी ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. काही कारणास्तव त्याचे बॉस त्याला पुन्हा एजन्सीमध्ये बोलावतात.  रामूच्या चित्रपटातील गाण्यावरून प्रेरित होऊन शीर्षक ठेवणार्‍या अहमदला पुन्हा एकदा रामूसोबत काम करण्याची इच्छा आहे.

Leave a Comment