रुपयाच्या घसरणीमुळे भारतातील पर्यटनाला चालना

गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या महिनाभरात ही घसरण सुरूच असल्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाचे दर ५५ रुपयापर्यंत खाली आले आहेत. रुपयाच्या घसरणीचा फायदा मात्र भारतातील पर्यटन स्थळाला झाला असून, अनेक पर्यटकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त विदेशी पर्यटन स्थळाला भेट देण्याचे रद्द केले आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त भारतातील लाखो पर्यटक विदेशातील पर्यटन स्थळास भेट देणे पसंत करतात. त्यासाठी त्यांनी दोन महिन्यांपूर्वी बुकिंगही केले होते. मात्र रुपयाची हो असलेली घसरण पाहून त्यांनी खर्चाच्या भीतीमुळे हे दौरे रद्द केले आहेत. विशेषत: या पर्यटकांनी अमेरिका व ब्रिटनमधील काही पर्यटनस्थळाला भेटी देण्याचे ठरवले होते. जवळपास २० ते २५ नागरिकांनी विदेशाच्या बुकिंग रद्द केल्या आहेत.

भारतातील काही पर्यटकांनी विदेशाऐवजी देशांतर्गत असलेल्या पर्यटन स्थळाला भेटी देवून त्यातच समाधान मानले. पर्यटकांनी भारतातील काश्मीर, राजस्थान, गोवा व मध्य प्रदेशातील पर्यटन स्थळाला भेट देवून त्याठिकाणचे सौंदर्य पाहणे पसंत केले. त्यासोबतच १० ते १५ टक्के पर्यटकांनी भारताऐवजी अग्नेय आशियातील आयर्लंड, मलेशिया, सिंगापूर व श्रीलंकेतील पर्यटनासाठी बुकिंग केले आहे.

एकंदरीत रुपयाच्या घसरणाचा फटका भारतातील उद्योगक्षेत्रांना बसला असला तरी पर्यटन क्षेत्राला मात्र याचा फायदा झाला. त्यामुळे या मौसमात पर्यटन क्षेत्राला चालना मिळाली आहे.

Leave a Comment