
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या `जन्नत-२’ या चित्रपटाच्या यशाची नशा चित्रपटाची अभिनेत्री ईशा गुप्तावर अद्याप आहे. ती तिचा आनंद व्यक्त करताना म्हणते की, या चित्रपटाच्या यशामुळे मी निश्चितच खुश आहे; पण या चित्रपटाच्या यशाबाबत मी साशंक नव्हते. कारण भट्ट कॅम्पचे चित्रपट प्रेक्षकांना कधीच नाराज करीत नाहीत, हे मला माहीत होते. या चित्रपटाचा हीरो इमरान हाश्मी तिचा लकी चार्म असल्याचे ईशा मानते. त्याच्यासोबत राज-२ या चित्रपटातही ईशा दिसणार आहे. आपल्याला कधीच अभिनेत्री बनायचे नव्हते, कधी लेखक तर कधी वकील बनायची आपली इच्छा होत असे; पण मी अभिनेत्री बनले, असे ईशा म्हणते.
