बेस्ट उपक्रम बस सर्व्हिसबाबत हलगर्जीपणा करणार्‍या टाटा कंपनीला नोटीस बजावणार

मुंबई, दि. २९ – बेस्ट उपक्रमाच्या टाटा कंपनीच्या बसगाड्यांसाठी टाटा कंपनीकडून गाडीचे पार्ट वेळेवर मिळत नाहीत. सर्व्हिस निरक्षणे दिली जात नाही. परिणामी बसगाडया डेपोमध्ये उभ्या ठेवाव्या लागतात. तसा परिणाम परिवहन विभागाच्या उत्पन्नावर होत असल्याने आता बेस्टतर्फे टाटा कंपनीला नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत दिली.

बेस्ट उपक्रमाच्या दिंडोशी डेपोमध्ये एसी बसगाड्या नादुरुस्त अवस्थेत उभ्या आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे नगरसेवक किसन जाधव यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे बेस्ट समितीच्या बैठकीत दिली. दिंडोशी डेपोमध्ये नादुरुस्त १७ ते १८ एसी बसगाड्या उभ्या असून अधिकारी व बसगाड्यांचे पार्टस् पुरवणारे कंत्राटदार यांच्यातील तंट्यामुळेबसचे पार्टस् मिळत नसल्याची माहिती शिवसेनेचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी दिली.

बसगाड्या डेपोत उभ्या राहणे चुकीचे असल्याचे सांगत कॉंग्रेसचे रवी राजा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Leave a Comment