पुणे द्रूतगती महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या उपाययोजनेसाठी अधिकार्‍यांचा अभ्यासगट स्थापन – सतेज पाटील

मुंबई, दि. १ – मुंबई – पुणे द्रूतगती महामार्गावर वारंवार होणार्‍या अपघाताच्या संदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी पोलीस अधीक्षक (महामार्ग) पुणे, राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता आणि परिवहन उपायुक्त या तिघांचा अभ्यासगट स्थापन करुन त्यांनी १५ दिवसांत अहवाल सादर करावा, अशा सूचना गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या.

रस्ता सुरक्षा आणि अपघात यांच्या संदर्भात द्रूतगती महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत पाटील म्हणाले की, महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. त्यासंबंधी ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच मोटार वाहन कायद्यांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालक आणि मालक यांच्यावर कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी, असे आदेशही दिले.

Leave a Comment