पेट्रोल महागाई मुळे अभिनेते आता सायकल चालविणार

वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांप्रमाणे आता इतरांनाही बसत आहे. पेट्रोलच्या दरात वाढ केल्याने बॉलीवूडमधील अभिनेत्यांनाही त्याची झळ बसत असून त्यांनी आता बाईक व गाड्याने प्रवास करण्याऐवजी सायकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलीवूडमधील अभिनेत्री बिपाशा बसूने पेट्रोलची किंमत वाढल्याने सायकलचा वापर करण्याचे ठरविले. तिच्या मते दररोज खर्चाची बचत तर होणारच आहे, शिवाय व्यायाम होणार आहे. लांब जायचे असेल तर ती गाडीचा वापर करणार आहे.त्याप्रमाणेच अभिनेत्री नेहा धुपियाने दरवाढीवर मात करण्यासाठी सायकलचा वापर करण्याचे ठरविले आहे. अभिनेत्री नीतू चंद्राने मात्र दरवाढीची खिल्ली उडविताना यापूर्वी गाडी खरेदी करण्यासाठी वाहन लोन घेतले जात होते. आता पेट्रोल खरेदीसाठी लोन घ्यायची वेळ आली आहे अशी मुक्ताफळे उधळली आहेत.

अभिनेता अमोल गुप्ते याला डॉक्टरांनी काही दिवसांपूर्वी तब्बेत सुधारण्यासाठी सायकलचा व्यायाम करण्याचे सुचविले होते. आता पेट्रोल दरवाढीमुळे मला सायकलचा वापर करावा लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर अभिनेता सोनू सूदला सतत बदल होणार्‍या पेट्रोलच्या दरवाढीला कंटाळून आता सायकल चालविण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही.

बॉलीवूडमध्येही याचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला आहे. यापुढील काळात चित्रपटात सुद्धा खलनायकाच्या मोटारीचा पाठलाग आता कार अथवा बाईक ऐवजी सायकलवरून करताना नायक दिसला तर नवल वाटायला नको.

Leave a Comment