आमिरच्या ‘तलाश’ चे प्रदर्शन लांबले

प्रेक्षकांइतकीच बॉलीवूडवासीयांनाही आमिर खानच्या चित्रपटाची उत्सुकता असते; पण ‘सत्यमेव जयते’ या आपल्या महत्त्वाकांक्षी शोमुळे आमिरने ‘तलाश’चे प्रदर्शन पुढे ढकलले. सत्यमेव जयतेच्या प्रमोशनसाठी पुरेसा वेळ मिळावा तसेच या शोद्वारे समोर आलेल्या समस्यांवर योग्य विचारविर्मश करायला वाव मिळावा यासाठी आमिरने जून महिन्यात प्रदर्शित `तलाश’चे प्रदर्शन नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलले होते.

पण हाती आलेल्या बातमीनुसार तलाशचे प्रदर्शन आणखी लांबण्याची शक्यता आहे. जून महिन्यातील तारीख रद्द केल्यानंतर निर्धारित करण्यात आलेल्या आमिरचा तलाश चित्रपट ३० नोव्हेंबरऐवजी १२ डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याची कुजबुज सध्या इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे. खरे काय ते जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. रिमा कातगीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘तलाश’च्या निमित्ताने आमिर खान आणि राणी मुखर्जी पुन्हा एकत्र आले आहेत. याशिवाय ‘थ्री इडियट’नंतर करिना कपूर पुन्हा एकदा आमिरसोबत दिसणार आहे.

Leave a Comment