
दिल्ली, दि. २ – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि योगगुरू बाबा रामदेव हे उद्या राजधानीत एक दिवसाचे उपोषण करणार आहेत. देशात माजलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराचे निर्मूलन करावे आणि विदेशात ठेवलेला भारतीयांचा प्रचंड काळा पैसा देशात परत आणावा, या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत आहे. राजधानीतील जंतरमंतर येथे; तसेच सर्व राज्यांच्या राजधान्या आणि देशभरातील ६५० जिल्हास्थानी उद्या निषेधाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचे बाबा रामदेव यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. ’टीम अण्णा’ने पंतप्रधान मनमोहनसिंह आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील १४ मंत्र्यांवर नव्याने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर उद्याचे उपोषण होत आहे.