पाकिस्तानविरूद्ध खेळण्यास धोनी तयार

भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने होणार असतील तर त्यात खेळायला आपल्याला आवडेल असे भारतीय संघाचा कप्तान महेंद्रसिंग धोनी याने सांगितले आहे. या दोन देशांत क्रिकेट सामने झाले तर ते दोन्ही देशांच्या हिताचे ठरेल असे सांगून तो म्हणाला की मुंबईवरील हल्ल्यानंतर या दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे. मोहालीत विश्वकप सामन्यातील उपांत्य सामना भारत पाकिस्तानच्या संघात झाला आणि त्यात भारत विजयी झाला होता. त्यानंतर या दोन्ही देशांत सामने झालेले नाहीत.

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अशरफ यांना आमंत्रण दिले गेले होते तसेच चॅपिंयन लिग, टी-२० सामन्यात पाकिस्तान सहभागी झाल्यास दोन्ही देशांतील संबंध सुरळीत होण्यास मदत होईल असा विश्वास वाटतो. मात्र या सामन्यांच्या वेळापत्रकाबाबत आपल्याला कांहीही माहिती नसल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

Leave a Comment