किंगफिशरला विक्रमी तोटा

मुंबई, दि. १ -कोट्यवधींची कर थकबाकी असल्यामुळे आधीच बँक खाती गोठविलेल्या किंगफिशरच्या अडचणी वाढल्या आहेत. कंपनीला जानेवारी ते मार्च या तिमाहीत १,१५१ कोटी ५२ लाख रूपयांचा तोटा झाला. कंपनीची ही आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी ठरली आहे.

कर्मचार्‍यांच्या संपाचा फटका बसलेल्या कंपनीला गेल्या तीन महिन्यांत अनेक विमानांच्या फेर्‍या रद्द कराव्या लागल्या होत्या. यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यातच हवाई इंधनाच्या वाढत्या किंमती आणि रूपयाचे अवमूल्यन यामुळेही तोटयात आणखी भर पडल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ३५५ कोटी ५५ लाख रूपयांचा तोटा झाला होता. विशेष म्हणजे, कंपनीने एकदाही नफा कमविलेला नाही. २०११-१२ वर्षासाठीही कंपनीला दोन हजार ३२८ कोटी  रूपयांचा तोटा झाला. २०१०-११ च्या तुलनेत यात दुपटीने वाढ झाली. प्रत्येत तिमाहीत वाढणारा तोटा, कर्मचार्‍यांचे थकलेले पगार, सरकारची थकबाकी व वाढणारा कर्जाचा डोंगर यामुळे कंपनीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

Leave a Comment