इमरान खान फॉर्ममध्ये

`एक मैं और एक तू’ या चित्रपटात आपल्यापेक्षा वयाने मोठया असलेल्या करिना कपूरसोबत जोडी बनवणारा इमरान खान सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. अफेअरच्या बातम्यांपासून काहीसा दूर असलेला इमरान काही दिवसांपूर्वी ‘आय हेट लव्ह स्टोरी’ म्हणताना दिसला होता. इमरानसोबतच्या पुनीतच्या या दुसर्‍या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. ‘पप्पू कांट डान्स साला..’ असे म्हणत बॉलीवूडमध्ये दाखल झाल्यानंतर इमरानचा ‘दिल्ली बेल्ली’ हा वादग्रस्त चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.  सध्या इमरानच्या खिशात काही महत्त्वाचे चित्रपट आहेत. यात विशाल भारद्वाजच्या दिग्दर्शनाखाली  ‘मातरू की बिजली का मंडोला’ या चित्रपटात इमरान मातरूच्या भूमिकेत दिसेल तर ‘वन्स अपॉन अ टाईम अगेन’ यात तो असलम नावाचे पात्र साकारतोय. याशिवाय तिगमांशु धुलियांनी इमरानसोबत ‘मिलन टॉकीज’नावाचा चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. पुनीतने आपल्या आगामी सिनेमातील कलाकारांची घोषणा अद्याप केली नसल्याने या चित्रपटात्त इमरानसोबत इतर कोणते कलाकार काम करणार हे गुलदस्त्यात आहे.

Leave a Comment