अणांच्या आंदोलनात पुण्यातील ७२ संघटना सहभागी

पुणे, दि. ३१ – स्वामी रामदेवबाबा आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एकत्रित जंतरमंतर दिल्ली येथे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील विविध ७२ संघटना एकत्र येणार असून त्या कर्वे रोडवरील स्वा. सावरकर स्मारक येथे सकाळी ९ वाजल्यापासून आंदोलन करणार आहेत. यामध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे विजय वरुडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या आंदोलनामार्फत भारतातील देशाबाहेर असणारे काळे धन परत आणावे, सक्षम जनलोकपाल विधेयक संसदेत मंजूर करावे आणि देशातील नागरिकांना न्याय देणारी त्यांच्या प्रश्‍नांना समाधान देणारी व्यवस्था निर्माण व्हावी, या मागण्या करण्यात येणार आहेत. याशिवाय देशात ५० रुपयांच्या वरील नोटा बंद करून बँकेमार्फत कोणताही व्यवहार केल्यास महागाई ३० टक्के कमी होऊ शकते, असा विश्‍वास यावेळी व्यक्त केला. देशात जलदगती न्यायालये स्थापन करून भ्रष्टाचार करणार्‍यास फाशी किंवा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद कायद्यात करावी, या मागण्याही करण्यात येणार आहेत. या आंदोलनासाठी देशातील जवळपास दीड कोटी नागरिक सहभागी होत आहेत, असे राधेश्याम जगताप यांनी सांगितले. देशातील प्रत्येक जिल्ह्यात अगदी प्रत्येक मानव वस्तीच्या ठिकाणी हे आंदोलन होणार असल्याचे रमेश आगरवाल आणि शेखर मुंदडा यांनी सांगितले.

Leave a Comment