एडन, दि. ३१ – येमेनच्या लष्कराने हवाई दलाच्या साथीने केलेल्या कारवाईत अल् कायदा या कुख्यात दहशतवादी संघटनेचे २२ अतिरेकी ठार झाल्याचे वृत्त आहे. सतत धुमसत असलेल्या अबायान प्रांतात येमेनी लष्कराने ही कारवाई केली होती.

लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत येमेनी लष्कराचेही सहा जवान आणि तीन अन्य जणही ठार झाले. अबायान प्रांतातील जार या शहरात ही कारवाई केल्याचे लष्करी अधिकार्यांनी स्पष्ट केले. हा भाग दहशतवाद्यांचे नंदनवन समजला जातो. १२ मे पासून सुरू असलेल्या या लष्करी मोहिमेत आत्तापर्यंत सुमारे ३५० जण ठार झाले आहेत.