भारताची गाठ अर्जेंटिनाशी

मलेशिया, दि. २९ – मलेशिया येथे सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत सुरूवातीच्या सामन्यातच न्यूसी लॅडकडून ५-१ असा पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर दक्षिण कोरियावर २-१ विजय मिळवित भारताने स्पर्धेतला पहिला विजय नोंदविला. ब्रिटनकडून पराभूत झाल्यामुळे स्पर्धेत पिछाडीवर पडलेल्या भारताने सोमवारी मलेशियावर ३-२ अशी मात करीत आपले आव्हान बळकट करण्यात यश मिळविले. दरम्यान, ब्रिटनचा संघाला अर्जेटिनाने २-३ असे पराभूत केल्याने स्पर्धेतील रंगत अजूनच वाढली आहे. न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत नऊ गुणांसह आघाडीवर असून भारत आणि अर्जेंटिना हे सहा गुणांसह संयुक्तपणे दुसर्‍या स्थानावर आहेत. त्यामुळे बुधवारच्या सामन्यावर दोन्ही संघांचे स्पर्धेतील भवितव्य ठरणार आहे. भारतीय हॉकी संघाच्या स्पर्धेत आगेकूच करायची असल्यास बुधवारचा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकणे गरजेचे आहे. ३१ मे रोजी या स्पर्धेत भारतीय हॉकी संघ आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडणार आहे.

Leave a Comment