टायब्रेकरमध्ये निर्णय ठरणार

भारताचा ग्रँडमास्टर विश्‍वनाथन आनंद आणि इस्त्रायलचा बोरीस गेलफड यांच्यात सोमवारी मॉस्को इथे झालेली १२ वी फेरी सुध्दा बरोबरीत सुटली. त्यामुळे निर्णयासाठी टायब्रेकरनर आता विसंबून रहावे लागणार असल्याने आजच्या विश्रांतीनंतर दोन्हीही खेळाडू बुधवारी निर्णायक टायब्रेकरला सामोरे जातील. विश्‍वनाथन आनंद हा झटपट चाली खेळण्यात पटाईत समजला जातो, त्यामुळे गेलफडचेही त्याच्या या खेळावर नक्कीच लक्ष राहणार आहे.

आतापर्यंत झालेल्या १२ फेर्‍यांमधल्या १० फेर्‍या या बरोबरीत सुटल्या होत्या. त्यामुळे गेलफड सुध्दा फेरीगणिक चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. दुसरीकडे विश्‍वनाथन आनंदही आपले जगज्जेतेपद कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. टायब्रेकरमध्ये दोन्ही खेळांडूमध्ये पाच फेर्‍या होतील. प्रत्येक खेळाडूला २५ मिनिटांचा अवघी दिला जाणार आहे. यानंतरही दोन्ही खेळाडूंमध्ये बरोबरी झाल्यास ब्लिट्स बुध्दीबळ नियमाप्रमाणे फेर्‍या खेळवण्यात येतील. जगज्जेतेपदाचा निकाल भारतीय वेळेप्रमाणे बुधवारी सायंकाळी लागणार आहे.

Leave a Comment