अल कायदाचा अफगाणिस्तानातील वरीष्ठ नेता नाटो हल्ल्यात ठार

बगदाद दि.३० – अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली नाटो सैन्याने अफगाणिस्तानातील कुणार परगण्यात केलेल्या विमानहल्ल्यात अल कायदाचा दुसरा वरीष्ठ नेता सखर अल तैफी हा ठार झाला असल्याचे वृत्त आहे. तैफी हा मुश्ताक आणि नसीम या नावांनीही ओळखला जात होता. अफगाण सैन्य तसेच अमेरिकेचे सैन्य आणि नाटो सैन्यांवर हल्ले करण्याची महत्त्वाची जबाबदारी तैफी पार पाडत होता असेही समजते.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार तैफी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान सतत फेर्‍या मारत असे आणि पाकिस्तानातील अल कायदाच्या वरीष्ठ नेत्यांकडून आलेल्या हुकुमानुसार कारवाई करत असे. सैन्य आणि शस्त्रास्त्रे आणण्यात त्याचा मोठा सहभाग होता. नाटोच्या विमानहल्ल्यात तैफी बरोबरच अन्य एक अल कायदा दहशतवादीही ठार झाला आहे.

अमेरिकेने अफगाणिस्तावर हल्ला करण्यामागे अल कायदा प्रमुख ओसामा बिन लादेनने अमेरिकेवर ११ सप्टेंबरला केलेल्या हल्याचा कट येथे रचला होता हे कारण आहेच पण आबोटाबाद येथे लादेन ठार झाल्यानंतर तेथे मिळालेल्या कागदपत्रांवरून लादेनने अल कायदा सदस्यांनी अफगाणिस्थानच्या डोंगराळ व दुर्गम भागात आश्रय घ्यावा असे आदेश दिले असल्याचेही स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानातील वझीराबाद भागात अमेरिकेने वारंवार केलेल्या ड्रोण हल्ल्यात अनेक अल कायदा नेते ठार झाले आहेत आणि आता त्यांचे थोडेच लोक जिवंत आहेत असेही सांगण्यात आले आहे.

Leave a Comment