पर्यटकांना आकर्षित करण्यात मध्यप्रदेशची आघाडी

विविध पर्यटन स्थळांनी नटलेला प्रदेश म्हणून देशभरात सध्या मध्य प्रदेशची ख्याती आहे. तेथील खजुराहो, पचमढी, महेश्‍वर सहित अनेक पर्यटनस्थळे सर्वांना आकर्षित करीत असतात. त्याचाच फायदा घेत आता मध्य प्रदेश पर्यटन विभागाने पर्यटकांची संख्या आगामी काळात वाढावी या उद्देशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर जाहिरातीच्या माध्यमातून प्रचार व प्रसार सुरू केला आहे.
Madhya-Pradesh1
भारतातील विविधतेने नटलेल्या पर्यटनस्थळाचे सदैव सर्वांना आकर्षणच राहिले आहे. त्यामुळेच विदेशातील लाखो पर्यटक भारतात येतात. त्यांच्यामुळे भारतातील पर्यटनस्थळांचा दर्जा कितीतरी पटीने उंचावला आहे.
Madhya-Pradesh3
विशेषत: मध्यप्रदेशातील प्राचीन काळापासून चालत असलेल्या राजे रजवाड्यांची संस्कृती जाणून घेण्याची उत्सुकता अनेकजणांना लागलेली असते. यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत मध्य प्रदेशातील पर्यटन स्थळे पाहण्यासाठी विदेशी पर्यटकांचा लोंढा अधिक असतो.
Madhya-Pradesh4
मध्य प्रदेश पर्यटन विभागाने राज्यातील सर्वच पर्यटन स्थळांची माहिती एकत्रित मिळावी या उद्देशाने संपूर्ण माहिती असलेले ‘मॅगझीन’ काढले आहे. त्यामुळे सर्वांनाच येथील पर्यटन स्थळांची सखोल माहिती मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनाच येथील पर्यटन स्थळांची सखोल माहिती मिळणार आहे.
Madhya-Pradesh5
त्यासोबतच पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी सर्वत्र रोड शो आयोजन केले जात असून या माध्यमातून नागरिकांची जनजागृती करण्यात येत आहे. विशेषत: हा ग्रेड शो जर्मन, फ्रेंच, चीन, ब्रिटन व इटाली या देशांत आयोजित करण्यात आला आहे.
Madhya-Pradesh12
त्याच बरोबर खजुराहो, पंचमढी सोबतच महेश्‍वर येथील पर्यटन स्थळांवर आता विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
Madhya-Pradesh
त्यामध्ये इंटरनरसेंट पार्क, स्विमींग पूल, नाईट क्लब, साऊंड एंड लाईटची निर्मिती केली आहे. त्यामुळे आगामी काळात मध्य प्रदेशातील पर्यटनस्थळ पाहण्यासाठी लाखो पर्यटकांची गर्दी होणार आहे.

Leave a Comment