आदर्श प्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठी सीबीआयचा वापर

मुंबई, दि. २९ – आदर्श गृहनिर्माण संस्थेतील घोटाळेबाजानंतर वेळेत आरोपपत्र दाखल न करण्यात आल्याने विशेष न्यायालयाने सात आरोपींना जामीनावर मुक्त केले आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. या आरोपींना वाचविण्यासाठीच राज्य सरकार केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीबीआय) वापर करीत आहे, असा थेट आरोपच त्यांनी केला आहे.

आदर्श गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याप्रकरणी सनदी अधिकारी प्रदीप व्यास यांच्यासह सहा व्यक्तींना सीबीआयने अटक केली होती. मात्र, या आरोपींच्या विरोधात ६० दिवसांत सीबीआयच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात अपयश आल्याने या न्यायालयाने सात आरोपींना पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली आहे. या घटनेवर भाष्य करताना मुनगंटीवार यांनी शासनाच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Leave a Comment