नवी दिल्ली, दि. २९ – लष्कर-ए-तैयब्बाचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार हाफिज सईदला ताब्यात देण्यासाठी भारताने पाकिस्तानला ५५ कोटी रूपये देण्याची तयारी दर्शविली आहे.
नवी दिल्ली, दि. २९ – लष्कर-ए-तैयब्बाचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार हाफिज सईदला ताब्यात देण्यासाठी भारताने पाकिस्तानला ५५ कोटी रूपये देण्याची तयारी दर्शविली आहे.
गेल्या आठवड्यात इस्लामाबाद येथे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या गृहसचिवांमध्ये झालेल्या बैठकीत भारताचे गृहसचिव आर. के. सिंह यांनी हे वक्तव्य केले. सईदला दोषी ठरविण्यासाठी पुरावे देणार्यास अमेरिकेने एक कोटी डॉलरचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. हे बक्षिस भारत आपल्या खिशातून देणार का? असा प्रश्न बैठकीनंतर एका पाकिस्तानी पत्रकाराने सिंह यांना विचारला. तेव्हा या प्रश्नावर उत्तर देत सिंह म्हणाले की, ५५ कोटी रूपये घेवून पाकिस्तानने सईदला भारताच्या ताब्यात दिले तर आनंदच होईल.