जगभरातल्या इंटरनेट ग्राहकांना गुगलचा सावधगिरीचा संदेश

वॉशिग्टन दि.२९- जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने त्याच्या कोट्यावधी ग्राहकांना ९ जुलैपासून इंटरनेट कनेक्ट करण्यात अडचणी येऊ शकतात असा इशारा दिला आहे. आंतरराष्ट्रीय हॅकर्सनी ऑनलाईन अॅडव्हटायझिंग स्कॅम करून जगभरातील लक्षावधी संगणक विषाणूंनी बाधित केले आहेत व त्यामुळेच हा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्कॅमद्वारे जगभरातले अनेक बाधित संगणक या हॅकर्सनी आपल्या नियंत्रणात आणले आहेत असे समजते.

या जाहिरातींना जो प्रतिसाद मिळत होता तो पाहून सावध झालेल्या एफबीआयने १ महिन्यापूर्वीच सरकारी संगणक वापरून सेफ्टी नेट तयार करून या विषाणूंना प्रतिबंध केला होता. त्यामुळे बाधित संगणक सहज ओळखता येत होते मात्र याचा वापर ९ जुलैपासून बंद होत असल्याने बाधित संगणक असलेल्या ग्राहकांची नेट कनेक्शन डेड होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. एफबीआयने वेबसाईटवरूनच युजर्सना त्यांचा संगणक विषाणूने संगणक बाधित झाला आहे अथवा नाही आणि तो झाला असल्यास काय करावे याची सोल्यूशन्स देणारी वेबसाईट पाहावी यासाठी कॅम्पेन सुरू केले आहे.

Leave a Comment