आयपीएलचे पोस्टमार्टम

मुंबई – रविवारी झालेल्या आयपीएलच्या पाचव्या हंगामातील अंतिम सामन्यात बाजी मारली ती किग खान शाहरूख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स या संघाने. त्यांच्या या विजयामुळे आयपीएलला एक नवा विजेता मिळाला आहे. रविवारच्या सामन्यात अशक्य वाटणारे लक्ष्यही त्यांनी पूर्ण केले. आणि चेन्नईचे तिसरे अजिक्यपद मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळविले. आयपीएलच्या या सत्रातला ऑरेंज कॅप चा मानकरी ठरला तो वेस्टइंडिजचा ख्रिस गेल. आपल्या तुफानी फलंदाजीचा जोर या हंगामातही कायम ठेवून त्याने सलग दुसर्यांदा ऑरेंज कॅप पटकावली. त्याने या हंगामात १५ सामन्यांमध्ये ७३३ धावा तडकावल्या यामध्ये ५९ उत्तुंग षटकारांचा समावेश आहे. तर पर्पल कॅप चा मानकरी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा मॉर्ने मॉकर्ल ठरला. आयपीएलचा हा हंगाम सर्वात जास्त लक्षात राहिला तो वादांमुळे प्रथम पाच खळाडुंच्या स्टिंग ऑपरेशनचे भूत आयपीएलवर बसले, त्यानंतर या पाचही खेळाडूनंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली, त्याआधी शाहरूख खानने सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढल्याचे प्रकरण हे नुकतेच ताजे होते. त्यानंतर ल्युक पॉमरबॅश या ऑस्टलियन खेळाडूने एका तरूणीशी छेडछाड केल्याचे प्रकरणही खूप गाजले. मुंबई आणि कोलकाता सामन्यानंतर संघाचा मालक शाहरूख खान याने मुंबई क्रेकेट संघटनेच्या पदाधिकार्यांची हुज्जत घातली, त्यामुळे शाहरूख खानवर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आजीवन बंदी घालण्यात आली. आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना फिक्स असल्याचेही बोलले गेले.

एकंदर आयपीएलचा हा हंगामा सर्व स्तरावर गाजला तो मैदानाबाहेरच्या घडामोडींमुळे. आयपीएलमधील बेशिस्त वर्तन बघून किर्ती आझााद यांच्यासह काही खासदारांनी आयपीएलवर बंदी घालण्याची मागणी केली होती, पण त्यांची मागणी हा राजकिय स्टंट होता की खरच खेळाबाबतची तळमळ होती, हाच एक मोठा प्रश्न आहे. खेळाडूंचे झालेले स्टिंग ऑपरेशन, स्पॉटफिक्सिंग प्रकरण, संघमालकांची बेशिस्त वागणूक पाहता पुढील वर्षी या गोष्टी होऊ नयेत  या उद्देशाने स्पर्धेच्या नियमांचे परीक्षण करणार असल्याचे या स्पर्धेचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले तसेच पुढील वर्षीपासून स्थानिक खेळाडूंचा देखील लिलाव करण्यात योईल, असे ते म्हणाले. आता जरी त्यांनी स्थानिक खेळाडूंचा उल्लेख केला असला तरी इतक्या उशीराने बीसीसीआयचे डोळे इतक्या उशिरा का उघडले. हाच एक मोठा प्रश्न आहे. आयपीएलमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे संकेत मिळत आल्याने क्रिडामंत्री अजय माकन काही दिवसांपूर्वी बीसीसीआयला माहितीच्या अधिकारा अंतर्गत आणावे अणि त्यांनी व्यवहारात पारदर्शता आणावी, अशी मागणी केली होती. याबाबत शुक्ला उत्तर देताना म्हणाले, कायद्यामध्ये काही बदल झाल्यास आम्ही आरटीआयच्याअंतर्गत येण्यास तयार आहोत, मात्र सरकारकडून आम्हाला अजूनपर्यंत ग्रांट मिळालेली नाही. क्रिकेटला जेन्टलमन्स गेम म्हणून ओळखले जाते. १९८३ सालच्या क्रिकेट विश्वचषक विजयानंतर खर्या अर्थाने क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागले. २००७ च्या पहिल्या २० षटकांचा विश्वचषक जिकल्यानंतर भारतात आयपीएलचा जन्म झाला. क्रिकेट विश्वात भूमिवर पहिल्यांदाच खेळाडूंचा लिलाव झाला. करोडोंच्या बोली लागल्या. अनेक खेळाडू यामुंळे कोटयधीश झाले. आयपीएलच्या सर्कसला भारतीय क्रिकेटरसिकांनी शिरावर उचलले. दरवर्षी मे महिना म्हटले की आयपीएल असे गेणितच जुळले. आयपीएलने आपली पाच वर्षे पूर्ण केली. अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूंनी मैदान गाजवली. प्रक्षकांचे मनोरंजनही केले. पण या सर्वांमध्ये क्रिकेट कोठे तरी हरवले आहे, असे वाटते. क्रिकेटच्या जीवावर आयपीएल नावाचा मोठा व्यवसायच बीसीसीआयने उभा केला आहे. क्रिकेटच्या शॉर्टर प्रकारामुळे तरूण पिढी तांत्रिक क्रिकेट मात्र विसरत चालली आहे. त्यामुळे येणार्या काळात भारताचा संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी कामगिरी करतो हे नक्कीच पाहण्यासारखे असणार आहे, क्यूँकी ये आयपीएल हे भाई !

Leave a Comment