
मुंबई, दि. २९ – आदर्श गृहनिर्माण संस्थेतील घोटाळेबाजानंतर वेळेत आरोपपत्र दाखल न करण्यात आल्याने विशेष न्यायालयाने सात आरोपींना जामीनावर मुक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. या आरोपींना वाचविण्यासाठीच राज्य सरकार केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीबीआय) वापर करीत आहे, असा थेट आरोपच त्यांनी केला आहे.