फेसबुकमुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले

फेसबुकचे सीईओ मार्क -जेकरबग हे नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. याबाबतची माहिती जेकरबग यांनीच काही दिवसांपूर्वी फेसबुकवरून दिली आहे. त्यामुळे त्यांनी नुकताच विवाह केल्याचे फेसबुकच्या कोट्यवधी चाहत्यांना कळले. दुसरीकडे मात्र फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंगमुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे एका सर्व्हेक्षणानंतर पुढे आले आहे.

गेल्या वर्षभरात ब्रिटन मधील पाच हजार पेक्षा अधिक नागरिकांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी ३३% अर्ज हे केवळ फेसबुकच्या कारणामुळे दाखल झाले असल्याचे समजते. हेच प्रमाण २००९ मध्ये २०% टक्के इतके होते. त्यात झपाट्याने वाढ होत असल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. पती-पत्नी फेसबुकचा वापर करतात. यावेळी पती अथवा पत्नी एखाद्या मित्रांसोबत जास्त वेळा चॅटींग करणे अथवा अश्‍लिल मेसेज पाठवत असल्याचे लक्षात आल्याने घटस्फोटासाठी अनेकांनी अर्ज केले असल्याचे पाहणीत पुढे आले आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध लेखक जेसन क्राफस्की यांनी ‘फेसबुक एन्ड ऑर मॅरेज’ या पुस्तकाला किती तरी युजर्सनी क्लिक केले असल्याचे लक्षात आले आहे. त्याशिवाय ब्रिटनमधील ऍकडमी मेट्रोमनियल लायर्स संघाच्या वकिलाच्या मते गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. घटस्फोटापैकी ८० टक्के प्रकरण हे केवळ सोशल नेटवर्किंगच्या माध्यमामुळेच झाले आहेत.

घटस्फोटानंतर यापैकी काही युवक व युवती आपल्या पूर्वीच्या पार्टनरच्या कंमेटसवर टीका टीपणी करीत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आता सोशल नेटवर्किंगचा वापर करणार्‍या पती पत्नीनी जपूनच सोशल नेटवर्किंगचा वापर करण्याची गरज आहे.

Leave a Comment